महाराष्ट्र दिनी मुंबईच्या BKC येथे ‘मविआ’ची वज्रमूठ, बघा जय्यत तयारी
VIDEO | मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची जय्यत तयारी सुरु, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील सभेत कुणावर साधला जाणार निशाणा?
मुंबई : उद्या 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरनंतर आता तिसरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही मुंबईत होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी येथील मैदानावर या सभेची तयारी सध्या सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण सभा होणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार हे देखील महत्त्वाचे आहे. कारण आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी टिकणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाच आहे. तर मुंबईतील बीकेसीच्या मैदानातून मविआचे मोठे नेते, उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार कुणावर केली जाणार टीका? हे देखील उद्याच्या मविआच्या जाहीर सभेतून समोर येणार आहे.