पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार? ‘या’ नेत्यानं केलं मोठं वक्तव्य
'गोपीनाथराव मुंडे यांनी मला मुलगा मानलं, त्या नात्याने पंकजा मुंडे माझी बहीण, मी माझ्या बहिणालाच मुख्यमंत्री करणार', तर 145 आमदार निवडून आले तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू या नेत्याच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी मिश्किल टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : रासप नेते महादेव जानकर यांनी पक्ष बांधणीचा मोर्चा काढत अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रासपचे १४५ आमदार निवडून आले तर मी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल, असं मोठं भाष्य केलं. महादेव जानकर असेही म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी मला मुलगा मानलं, त्या नात्याने पंकजा मुंडे माझी बहीण झाली. आमच्या पक्षाचे जर १४५ आमदार निवडून आले तर मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेल, अशी घोषणाच महादेव जानकर यांनी केली. तर महादेव जानकर चमत्कार करू शकतात. 145 आमदार निवडून आले तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू या महादेव जाणकर यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी जानकर यांना मिश्किल टोला लगावला आहे.

शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत

दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
