‘तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी, दाबला जाणार नाही’; जानकर यांचा भाजपला खरमरीत इशारा
मंत्री आणि जागावाटपावरून तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट भाजपला इशाराच दिला होता. यानंतर आता जानकर यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावरून भाजपवर टीका केली आहे.
परभणी, 06 ऑगस्ट 2013 | गेल्या काही दिवसापासून युतितील भाजप आणि मित्र पक्षांमध्ये सुर बिघडल्याचे पहायला मिळत आहे. येथे रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना या सध्या काहीना काही कारणाने भाजपच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. तर मंत्री आणि जागावाटपावरून तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट भाजपला इशाराच दिला होता. यानंतर आता जानकर यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावरून भाजपवर टीका केली आहे. यावेळी, तुम्ही मला दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी दाबला जाणार नाही. मोठे पक्ष लहान पक्षाचे काय हाल करतात हे मी लोकांना सांगणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर माझं तुम्ही काही करू शकत नाही. ना माझा कारखाना आहे, ना दुसरे काही. त्यामुळे तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी दबणार नाही, असे म्हणत माझ्या बहिणीला (पंकजा मुंडे) त्रास देताय, तिला मी रासपात घेऊन मुख्यमंत्री केले तर काय होईल तुमचे असा सवाल देखील यावेळी सवाल जानकर यांनी भाजपला करताना एकाप्रकारे इशाराच दिला आहे.