महादेव जानकर महायुतीत, 'या' मतदारसंघातून लोकसभा लढण्याची शक्यता

महादेव जानकर महायुतीत, ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढण्याची शक्यता

| Updated on: Mar 24, 2024 | 6:33 PM

'महादेव जानकर यांनी महायुतीच राहणार असल्याचा निर्वाळा बैठकीत दिला. महायुतीमार्फत लोकसभेची एक जागा रासपला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही एक-दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर करु', सुनील तटकरे यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. महादेव जानकर हे परभमी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ‘महादेव जानकर यांनी महायुतीच राहणार असल्याचा निर्वाळा बैठकीत दिला. महायुतीमार्फत लोकसभेची एक जागा रासपला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही एक-दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर करु. त्यावेळी कोणत्या मतदारसंघात रासपला संधी दिली जाईल याबाबत जाहीर करू’, असे सुनील तटकरे म्हणाले. तर महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

Published on: Mar 24, 2024 06:33 PM