“ओबीसींची मतं चालतात, मग जातीनिहाय गणनेला विरोध का?” कोणी केला पंतप्रधान मोदी यांना थेट सवाल?
माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात येथे ही जनस्वराज्य यात्रा आली आणि तिचं रुपांतर छोटेखानी सभेत झालं. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय.
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात येथे ही जनस्वराज्य यात्रा आली आणि तिचं रुपांतर छोटेखानी सभेत झालं. यावेळी जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल.महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. आपला पक्ष चांगला जम धरत आहे. आपल्याला लोक स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठी फलटणमध्ये आलो आहे. तुम्ही मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे.”