शहापूरमध्ये 35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनच्या तारेची जोडणी
श्रावण शेलवले या वायरमनने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कसले ही सेफ्टिंग साहित्य नसतांना हातातील हॅन्डग्लोज व पकड तोंडात पकडून पाण्यात पोहत जाऊन पोल वरील तुटलेली हाइ टेन्शची तार जोडली व 35 गावांची गेलेली लाईट चालू केली.
शहापूर तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका महावितरणला ही बसला आहे. अनेक भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दि. 20 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आटगाव फिडरची लाईट गेली असतांना कानविंदे या गावा लगत असलेल्या एका तलावामध्ये लाईटचा पोल आहे या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला असतांना अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेली असताना साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो चालू करण्यासाठी श्रावण शेलवले या वायरमनने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कसले ही सेफ्टिंग साहित्य नसतांना हातातील हॅन्डग्लोज व पकड तोंडात पकडून पाण्यात पोहत जाऊन पोल वरील तुटलेली हाइ टेन्शची तार जोडली व 35 गावांची गेलेली लाईट चालू केली. त्यांच्या सोबत फोडसे म्हणून एक वायरमन होता आशा या महावितरणच्या दोन जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.