MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5:30 PM | 11 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5:30 PM | 11 June 2021

| Updated on: Jun 11, 2021 | 6:10 PM

महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (Mahafast 100 news)

  • मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, 17 तारखेपर्यंत पेरण्या टाळा, वाशिम कृषी विभागाचं आवाहन
  • मानाच्या दहा पालख्यांना एस टी बसने आषाढीवारीसाठी परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन
  • मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयातील लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत 1 हजार 145 रुपये
  • निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तब्बल साडेतीन तास बैठक
  • मुंबई महापालिका महापालिका निवडणुका वेळेत घ्या, शिवसेनेला चारीमुंड्या चीत करू; भाजप नेते आशिष शेलारांचा दावा, तर, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन
  • संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट लांबणीवर, उदयनराजे भोसलेंचं चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन, पुढील 4-5 दिवसात भेट होणार असल्याची माहिती, संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
  • 7)मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल,
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री मुकुल रॉय यांची घरवापसी, ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश
  • सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंगांना झटका, महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणांकडून चौकशी करण्याबाबतची याचिका फेटाळली
  • श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनकडे नेतृत्व IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड या मराठमोठ्या खेळाडूंना संधी!