MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 12 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 12 June 2021

| Updated on: Jun 12, 2021 | 6:57 PM

महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (Mahafast 100 news)

महाफास्ट न्यूज 100

  • मुंबई आणि कोकणात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट
  • मुंबईला पावसाने पुन्हा झोडपलं, मिठी नदीचं पाणी रेल्वे रुळावर, मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प, चाकरमान्यांचं प्रचंड हाल
  • तीन महिने अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलला परवानगी दिली नाही, मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा दावा
  • ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा
  • प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या उमदेवारीच्या चर्चांना उधाण, भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण
  • काँग्रेस यूपीएचा आत्मा, प्रशांत किशोर यांनी दोनवेळा सांगितलंय, राहुल गांधींच पंतप्रधान होणार, नाना पटोलेंचा दावा
  • काँग्रेसच्या आघाडीत किती पक्ष उरलेयत हे आता तपासायला हवे, नवी मजबूत आघाडी उभारण्याची गरज, संजय राऊतांकडून टोला
  • कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
  • 2024 ला मोदीच, जनता पार्टीसारखा प्रयोग मोदींविरोधात होऊन देणार नाही, रामदास आठवलेंचीही उडी
  • संभाजीराजे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
  • मी 2007 पासून मराठा आंदोलनात, हे केव्हा आले कळत नाही, मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
  • ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली, विनायक मेटेंची घोषणा
  • फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
  • ‘आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर’, मुनगंटीवारांचा संजय राऊतांवर पलटवार
  • वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता, अजित पवारांचं स्पष्टीकरण