VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 22 November 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 22 November 2021

| Updated on: Nov 22, 2021 | 2:51 PM

चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याचे समजते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत.

चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याचे समजते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत का निर्णय होणार, विलीनीकरणाचा विचार होणार का, याची उत्सुकता लागली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जवळपास 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. त्यात एसटीच्या खासगीकरणाची सुरू झालेली चर्चा. नाशिकमधल्या पेठ आगारातील कर्मचाऱ्याने कमी पगारामुळे केलेला आत्महत्या. या साऱ्या घटनांमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे.