VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 23 July 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 23 July 2021

| Updated on: Jul 23, 2021 | 1:58 PM

चिपळूण शहरातील पूरस्थिती ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

चिपळूण शहरातील पूरस्थिती ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्याने अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली.