VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 29 July 2021
पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
शरद पवार यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते, असा खोचक सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं खरं पण त्यानंतरही त्यांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला. कोकणात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नेमका हाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोचरा सवाल उपस्थित केला.
Latest Videos