VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 15 June 2021
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 15 आणि 16 जूनला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 15 आणि 16 जूनला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यामध्ये खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
Published on: Jun 15, 2021 12:13 PM
Latest Videos