VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 30 September 2021
यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा की संपूर्ण राज्यात जाहीर करायचा याबाबत विचार सुरू आहे.
Latest Videos