VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 11 May 2022
भाजप भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात कसं काम करतंय हे दिसून येतंय. त्यांच्याच हातात सूत्रं आहेत आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार? ज्यांच्या तोंडाला शेणाचा वास ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेत आहेत. आता यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येतील. सुरुवात या लोकांनी केली होती आता शेवट आम्ही करतोय. फक्त सोमय्यांचं एकट्याचं प्रकरण नाही. भाजपच्या 28 लोकांचं प्रकरण आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांसह भाजपच्या 28 नेत्यांची प्रकरणं उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या रडारवरील ते 28 नेते कोण? असा सवाल केला जात आहे. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यात लाखो रुपये आले होते. त्यामुळे सोमय्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात कसं काम करतंय हे दिसून येतंय. त्यांच्याच हातात सूत्रं आहेत आणि हे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार? ज्यांच्या तोंडाला शेणाचा वास ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेत आहेत. आता यांचा खेळ संपला आहे. रोज ही प्रकरणं बाहेर येतील. सुरुवात या लोकांनी केली होती आता शेवट आम्ही करतोय. फक्त सोमय्यांचं एकट्याचं प्रकरण नाही. भाजपच्या 28 लोकांचं प्रकरण आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.