VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 September 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 September 2021

| Updated on: Sep 12, 2021 | 1:48 PM

चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. दोघींचा भूकेने आणि आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वीच पोचू चौधरी यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या. गेल्या अनेक महिन्यापासून या मायलेकी आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती. तसंच बऱ्याच वेळी त्यांना काही खायला देखील मिळत नव्हतं. मृत्यूच्या अगोदर काही दिवस पोटात अन्नही नसल्याची प्राथमिक माहिती आहे.