VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 13 June 2022
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की, कोणत्याही आमदाराला घोडा म्हणणे हाच गाढवपणा आहे. ही चूक संजय राऊत यांच्या लक्षात आलीये. त्यामुळेच त्यांनी देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात यु टूर्न घेतल्याचे दिसते आहे. आमदार देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांबाबतची तक्रार योग्य असून त्यावर उपाययोजना लवकरच करू असेही आश्वासन संजय राऊत यांनी दिले आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की, कोणत्याही आमदाराला घोडा म्हणणे हाच गाढवपणा आहे. ही चूक संजय राऊत यांच्या लक्षात आलीये. त्यामुळेच त्यांनी देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात यु टूर्न घेतल्याचे दिसते आहे. आमदार देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांबाबतची तक्रार योग्य असून त्यावर उपाययोजना लवकरच करू असेही आश्वासन संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनीच धोका दिल्याचा आरोप करताना आधी हे आमदार घोडे बाजारात विकले गेल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला होता. मात्र भुयारांनी यांसदर्भात शरद पवार आणि संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
Published on: Jun 13, 2022 01:27 PM
Latest Videos