VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 13 September 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं, असं थोरात म्हणाले होते. काँग्रेसचे दुसरे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोरात यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं, असं थोरात म्हणाले होते. काँग्रेसचे दुसरे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोरात यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. बाळासाहेबांची भूमिका योग्यच आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचं समर्थन केलं. खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे.
Latest Videos