VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 22 August 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 22 August 2021

| Updated on: Aug 22, 2021 | 1:00 PM

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भारती पवार महाराष्ट्रात आहेत. कालवणला जात असताना रोडवरच्या एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहाचा अस्वाद घेतला. तसंच आपल्या सोबतच्या लोकांना देखील त्यांनी चहा वाटला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भारती पवार महाराष्ट्रात आहेत. कालवणला जात असताना रोडवरच्या एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहाचा अस्वाद घेतला. तसंच आपल्या सोबतच्या लोकांना देखील त्यांनी चहा वाटला. यावेळी आपण केंद्रीय मंत्री आहोत, हे त्या विसरुन गेल्या होत्या. गेल्या महिन्यात डॉ. भारती पवार यांची मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रिपदी निवड झाली. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. पण मंत्री झाल्यावरही त्यांनी आपला साधेपणा जपला.