VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 May 2022
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांकडून शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे. त्यामुळे शिवसेना संभाजीराजेंना पाठिंबा देणार की आपला उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांकडून शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे. त्यामुळे शिवसेना संभाजीराजेंना पाठिंबा देणार की आपला उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा पत्ता कट केला जाणार आहे. मात्र, नवा उमेदवार कोण असेल यावर काँग्रेसने सस्पेन्स ठेवला आहे. परंतु, काँग्रेस यावेळी राज्यसभेवर महाराष्ट्रातील नेत्यालाच संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या एक दोन दिवसात या राज्यसभेच्या उमेदवारांची नावं अधिकृतरित्या जाहीर होणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे.