VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 26 September 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 26 September 2021

| Updated on: Sep 26, 2021 | 12:48 PM

वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात जाणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. संजय राऊतांच्या पुणे दौऱ्यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. संजय राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी जगदीश मुळीक यांनी केली होती.