VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 December 2021
नव्या वर्षाच्या स्वागताला पुणेकरांना मेट्रोचा प्रवास घडणार आहे. शहरातील वनाझ ते रामवाडी या मार्गावर पहिली मेट्रो धावणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम वेगनवान पातळीवर सुरु आहे. या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती.
नव्या वर्षाच्या स्वागताला पुणेकरांना मेट्रोचा प्रवास घडणार आहे. शहरातील वनाझ ते रामवाडी या मार्गावर पहिली मेट्रो धावणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम वेगनवान पातळीवर सुरु आहे. या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. 3 डब्यांच्या 2 मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आला होता. पुणे शहरातील महामेट्रोच्या पहिल्या 33 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे काम वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होत असतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी 113 किलोमीटरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल.