VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 3 May 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मी एकदा मैत्रीचा हात पुढे केला. त्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले. मात्र ते आले नाहीत. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी जी भाषा वापरली त्यानंतर ते बोलावण्याच्या लायकीचेच उरले नाहीत, अशी खंत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. रमजान ईद निमित्त खासदार जलील औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मी एकदा मैत्रीचा हात पुढे केला. त्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले. मात्र ते आले नाहीत. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी जी भाषा वापरली त्यानंतर ते बोलावण्याच्या लायकीचेच उरले नाहीत, अशी खंत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. रमजान ईद निमित्त खासदार जलील औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आले होते. यावेळी हजारो भाविकांसोबत त्यांनी नमाज पठण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांना तुम्ही शिरखुरमा खाण्यासाठी बोलवाल का, असा प्रश्न खासदार जलील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. राज ठाकरे हे आता त्या लायकीचे राहिले नसून त्यांना दुरूनच ईद मुबारक देतो, असे खासदार जलील म्हणाले.
Published on: May 03, 2022 01:02 PM
Latest Videos