VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 3 September 2021
शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांच्याकडे शिवसेनेने महत्त्वाची जबाबदारी दिलीय. स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तींचे आदेश दिलेत.
शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांच्याकडे शिवसेनेने महत्त्वाची जबाबदारी दिलीय. स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तींचे आदेश दिलेत. यानुसार सचिन अहिर यांची पुणे संपर्कप्रमुख पदावर आणि आदित्य शिरोडकरांची पुणे सहसंपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलीय. मनसेत दीर्घ काळ कामाचा अनुभव असलेल्या आदित्य शिरोडकर यांना ऐन पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पुण्यात जबाबादारी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून पुण्यावर भर दिलाय.
Latest Videos