VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 August 2021
खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह आणि फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे खासदार रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Latest Videos