VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12:30 PM | 31 August 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12:30 PM | 31 August 2021

| Updated on: Aug 31, 2021 | 1:42 PM

अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार 11 वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला असून ईडीने त्याला मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार 11 वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला असून ईडीने त्याला मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं आहे. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी पत्रात म्हटलं आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.