VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 14 April 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 14 April 2022

| Updated on: Apr 14, 2022 | 3:57 PM

जेम्स लेनप्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागणी, अशी मागणी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. पवारांनी या प्रकरणावर मुंबईत बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगल्याचा दावा केला होता.

जेम्स लेनप्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागणी, अशी मागणी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. पवारांनी या प्रकरणावर मुंबईत बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगल्याचा दावा केला होता. मात्र, शिवशाहीर पुरंदरे यांच्यासह इतिहास तज्ज्ञांनी याप्रकरणी ऑक्सफर्ड प्रेसला ते वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे मागणी करत लिहिलेले निषेध पत्र सादर करून मनसेने पवारांची कोंडी केलीय. एका अर्थाने शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही.