महाफास्ट न्यूज 100 | 12 August 2021 | 7am
देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-पुणेसह महाराष्ट्रातील सर्व मोठ्या घडामोडी पाहा महाफास्ट 100 न्यूजमध्ये.
मुंबई : देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-पुणेसह महाराष्ट्रातील सर्व मोठ्या घडामोडी पाहा महाफास्ट 100 न्यूजमध्ये. राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिकस्थळे, सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून हे आदेश लागू होणार आहेत.
Latest Videos