MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 July 2021
तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय.
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणालेत. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय.