MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 October 2021
महाविकास आघाडीकडून दमदाटी करून उद्या दुकानं बंद करायला लावली जात असल्याचा भाजपने आरोप केला आहे. बळजबरीनं दुकानं बंद करायला लावणाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
हाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आली आहे. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर आमदार नितेश राणे यांनी चांगलीच टीका केली आहे. उद्या 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद करणार आहे. महाविकास आघाडीकडून दमदाटी करून उद्या दुकानं बंद करायला लावली जात असल्याचा भाजपने आरोप केला आहे. बळजबरीनं दुकानं बंद करायला लावणाऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असेही राणे पुढे म्हणाले. नितेश राणे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.