MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 September 2021

| Updated on: Sep 11, 2021 | 8:11 AM

सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असा वाकप्रचार त्यांनी सुरू केला होता. आता मी निर्दोष सुटलो. त्यांना हा वाकप्रचार वापरता येणार नाही. त्यांना दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाव न घेता तोफ डागली. सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असा वाकप्रचार त्यांनी सुरू केला होता. आता मी निर्दोष सुटलो. त्यांना हा वाकप्रचार वापरता येणार नाही. त्यांना दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला. (chhagan bhujbal taunt bjp over relief in maharashtra sadan case)

छगन भुजबळ आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी गप्पा मारता मारता आपल्या खास शैलीत भाजपवर आसूडही ओढले.

Published on: Sep 11, 2021 08:11 AM