MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 November 2021
नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आज आमदार नितेश राणे यांनीही आंदोलकांची भेट घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. याबाबत अनिल परब यांना विचारलं असता, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रत्युत्तर परब यांनी दिलं आहे.
नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.