MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 July 2021

| Updated on: Jul 14, 2021 | 8:35 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत केलेल्या गर्दी प्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयात मंगळवारी शेकडो कार्यकर्ते जमले होते. यासंदर्भात तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव डावलण्यात आल्याच्या कारणांवरुन समर्थकांमध्ये नाराजी होती. खदखद व्यक्त करण्यासाठी आणि एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वरळीत पंकजा मुंडेंच्या कार्यालयात मंगळवारी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. पंकजा मुंडे यांनी वरळीत यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. गर्दी जमवल्या प्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं.

Published on: Jul 14, 2021 08:35 AM