MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 September 2021

| Updated on: Sep 14, 2021 | 8:16 AM

गर्ल्स इस्लामिक फाउंडेशन या जमाते- ए – इस्लामी हिंद (नॉर्थ वेस्ट) गटाने नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी बाराही महीने पोलिस बंदोबस्त असतो, अशा माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात, भररस्त्यात दिवसा ढवळ्या हिंदू महिला व अज्ञान मुलीना धाक दाखवून जबरदस्तीने हिजाब घालण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न 4 सप्टेंबर रोजी करण्यात आला.

सामाजिक शांतता व सलोखा बिघडवणारे, दोन समाजात तेढ निर्माण करणारे, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे, धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच निर्माण करणारे, धमकी देऊन जमाव जमवून संघटितपणे अधार्मिक कृत्य पार पाडण्याची सक्ती करणारे कृत्य नागपूर येथे घडले. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या बाबत गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करावी तसेच या समाजविघातक कृत्यामागे असलेल्या संघटना व पदाधिकारी यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्धही अशाच प्रकारची फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

गर्ल्स इस्लामिक फाउंडेशन या जमाते- ए – इस्लामी हिंद (नॉर्थ वेस्ट) गटाने नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी बाराही महीने पोलिस बंदोबस्त असतो, अशा माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात, भररस्त्यात दिवसा ढवळ्या हिंदू महिला व अज्ञान मुलीना धाक दाखवून जबरदस्तीने हिजाब घालण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न 4 सप्टेंबर रोजी करण्यात आला. हिजाब घातलेल्या साधारण दहा ते पंधरा महिला व काही अंतरावर तेव्हढेच पुरुष एकत्रित येऊन अशा प्रकारचे कायदाविरोधी कृत्य संघटितपणे करत होते. हिंदू महिला व मुलीनी या अमानवी कृत्याला विरोध केल्यानंतर त्यांना धमक्याही देण्यात आल्या. परंतु काही पादचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला व त्या हिजाब घातलेल्या महिला व पुरुष तेथून पसार झाले असल्याचे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.