MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 October 2021

| Updated on: Oct 24, 2021 | 8:36 AM

मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे काय परग्रहावरुन आलेत का? शरद पवार हे या देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल तर सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना आपले गुरु मानतात. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, पवार माझे गुरु आहेत. त्यांचं बोट धरुन मी राजकारणात आलोय. म्हणजे एकप्रकारे हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत, अशा शब्दात सोमय्या यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडीवरुन किरीट सोमय्या हे तपास यंत्रणेचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना सोमय्या यांनीही संजय राऊत हे नेमके ठाकरेंचे की पवारांचे प्रवक्ते आहेत? असा सवाल विचारला. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे काय परग्रहावरुन आलेत का? शरद पवार हे या देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल तर सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवारांना आपले गुरु मानतात. त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, पवार माझे गुरु आहेत. त्यांचं बोट धरुन मी राजकारणात आलोय. म्हणजे एकप्रकारे हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत, अशा शब्दात सोमय्या यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय.

Published on: Oct 24, 2021 08:36 AM