MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 July 2021

| Updated on: Jul 26, 2021 | 8:29 AM

या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या असं सांगितलं. या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. हा संवाद कॅमेरात कैद झाला आहे.

भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचं नुकसान झाल्याचं ओरडून ओरडून सांगत होती. मदतीची याचना करत होती. ही मला रडतच आपल्या भावना व्यक्त करत होती. तिचा हा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले. तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्व मागण्या पूर्ण करू असं तिला आश्वासन दिलं. यावेळी या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या असं सांगितलं. या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांचे हातवारे, त्यांचा चढलेला आवाज आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहून सर्वच जण बुचकळ्यात पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा जाधव यांच्या वागण्याचीच चर्चा अधिक रंगली.

Published on: Jul 26, 2021 08:29 AM