MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 July 2021

| Updated on: Jul 27, 2021 | 8:40 AM

राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते.

हाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलंय त्यांना जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सात जिल्हे बाधित झाले आहेत, सातारा ,सांगली,कोल्हापूर पुणे जिल्ह्याचा थोडा बाधित झाला आहे.मी सगळी माहिती घेतली आहे. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिराळा ,वाळवा, पलूस भागात मोठे नुकसान झालं आहे. 80 बोट आपल्याकडे आहेत एनडीआरएफची दोन पथक काम करत आहेत. बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावे लागलं आहे.

Published on: Jul 27, 2021 08:40 AM