MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 September 2021
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. “बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे.
बारामती म्हटलं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही दोन नावे आलीच. हा भाग राजकीय दृष्टीकोनातून पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याला भेदणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असल्याचं म्हटलं जातं. पण हाच गड जिंकण्यासाठी तयारीला लागण्याची संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. बारामती हा माहाराष्ट्राचाच भाग आगे. आपण तिथे जिंकू शकतो. आपण सकारात्मक राहायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
पुण्यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना तसेच पक्षविस्ताराबद्दल सविस्तर भाष्य केलं. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकून येण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे असंदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. “बारामती आपली नाही, असं तुम्ही का गृहीत धरता. बारामतीही आपलीच आहे. बारामती महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही. पण संघटनेची ताकद वाढायला हवी. कधी वाटलं होतं का आपण पुरंदरला जिंकू ? हासुद्धा बारामतीचाच भाग आहे. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो ही सकारात्मक भावना ठेवली पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.