MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 August 2021
पोर्तुगालचा हा स्टार खेळाडू 12 वर्षानंतर त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये (Manchester United) परतला आहे. क्लबनेच शुक्रवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटससोबत तीन वर्षे घालवल्यानंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबमध्ये परतला आहे.
जागतिक फुटबॉलमध्ये काही दिवसांपूर्वीच एक मोठा बदल पाहायला मिळाला. तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) बार्सिलोना संघ सोडला. मेस्सीने पीएसजी संघात जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मेस्सीचा प्रतिस्पर्धी आणि फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यानेदेखील त्याचा सध्याचा संघ युव्हेंट्स (Juventus) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Manchester United deals to re-sign Cristiano Ronaldo from Juventus)
पोर्तुगालचा हा स्टार खेळाडू 12 वर्षानंतर त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये (Manchester United) परतला आहे. क्लबनेच शुक्रवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटससोबत तीन वर्षे घालवल्यानंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबमध्ये परतला आहे. युव्हेंट्सपासून विभक्त झाल्याची बातमी आल्यानंतर रोनाल्डो मँचेस्टर सिटीमध्ये जाऊ शकतो अशी अटकळ होती पण तो मँचेस्टर युनायटेडमध्ये दाखल झाला आहे.