MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7AM | 28 July 2021
पंतप्रधानांना भेटून राज्यातील पूरस्थिती आणि कोरोनाच्या परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात येईल. तसेच राज्याला तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही त्यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आर्थिक मदत मिळावी म्हणून भाजपचे काही खासदार आणि मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार आहेत. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी यांनी त्याबाबतची माहिती दिली. तसेच राज्याला भरीव मदत करण्यात यावी यासाठी पंतप्रधानांना आजच पत्रं लिहिल्याचंही संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केलं. (maharashtra mp to meet pm narendra modi over relief package for flood affected maharashtra)
संजयकाका पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आम्ही काही मंत्री आणि खासदार पंतप्रधानांना भेटणार आहोत. त्यांच्याकडे गुरुवारी भेटण्याची वेळ मागितली आहे. पंतप्रधानांना भेटून राज्यातील पूरस्थिती आणि कोरोनाच्या परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात येईल. तसेच राज्याला तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही त्यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.