MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2021
अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही. घाबरण्याचं कारण नाही, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे.
नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे.
परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांना काय वाटायचं ते वाटू दे. शेवटी त्यांना काही तरी वाटावंच लागेल ना. परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत. ते मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. थोडं परिवाराला द्यायचं आणि थोडं स्वत:ला ठेवयाचं हेच त्यांनी केलं. त्यामुळे राऊतांना काय बोलायचं ते बोलू द्या, असं ते म्हणाले. परबांनी काय केलं नसेल तर राऊतांना तमाशा करायची गरज नाही. त्यांना जाऊ द्या ना ईडीकडे. निर्दोष असतील तर काय घाबरायचं?, असा सवालही त्यांनी केला.