MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 October 2021

| Updated on: Oct 05, 2021 | 8:25 AM

शनिवारी केलेल्या या कारवाईनंतर आर्यन खानसह तिघांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली

मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने शाहखुन खानच्या मुलासह 8 जणांना अटक केली आहे. शनिवारी केलेल्या या कारवाईनंतर आर्यन खानसह तिघांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबीने आर्यन खानच्या फोनसंदर्भात कोर्टात मोठा दावा केला आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीने त्याच्याबाबत एक दावा केला आहे. आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह फोटो मिळाल्याचं एनसीबीने म्हटलंय. एनसीबीने आर्यन खानसह अन्य आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे. या आरोपींची पोलीस कोठडी मिळाली नाही तर या आरोपींकडे ड्रग्स कुठून आलं हे कळू शकणार नाही असं एनसीबीच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटलंय.

Published on: Oct 05, 2021 08:25 AM