MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM

| Updated on: Nov 23, 2021 | 8:01 PM

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप आणि अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि राऊत यांच्यात तब्बल 2 तास बैठक झाली.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप आणि अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि राऊत यांच्यात तब्बल 2 तास बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एसटी संपावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न सध्या सुरु असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी यावेळी केलाय.