MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 November 2021

| Updated on: Nov 06, 2021 | 8:39 AM

मुंबई क्रुझवर छापेमारी करण्यात आली. तेव्हा क्रुझवरील लोकांना बाहेरच्या लोकांनी ताब्यात घेतलं. आर्यन खानला तर केपी गोसावी घेऊन जाताना दिसत होता. ज्यांचा एनसीबीशी काहीच संबंध नाही अशा लोकांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला गेला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नेमका हाच पॉइंट वारंवार मांडून समीर वानखेडे आणि एनसीबीला अडचणीत आणलं.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. वानखेडे यांना नुसतं हटवलं नाही तर वानखेडेंकडून इतर पाच केसेसही काढून घेतल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात झालेल्या चुकांमुळेच समीर वानखेडेंची पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. नेमक्या या पाच चुका काय आहेत? त्याचाच घेतलेला हा आढावा.

मुंबई क्रुझवर छापेमारी करण्यात आली. तेव्हा क्रुझवरील लोकांना बाहेरच्या लोकांनी ताब्यात घेतलं. आर्यन खानला तर केपी गोसावी घेऊन जाताना दिसत होता. ज्यांचा एनसीबीशी काहीच संबंध नाही अशा लोकांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला गेला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नेमका हाच पॉइंट वारंवार मांडून समीर वानखेडे आणि एनसीबीला अडचणीत आणलं.

या कारवाईवर नवाब मलिक यांनी आणखी एक सवाल केला होता. एनसीबीने क्रुझवरील पार्टीवर कारवाई केली. ड्रग्ज पकडल्याचं सांगितलं. मग पंचनामा क्रुझवर का केला नाही? एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा का केला? असा सवाल मलिक यांनी केला होता. एनसीबीने क्रुझऐवजी एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा केल्याचे फोटोच त्यांनी व्हायरल केले होते. समीर वानखेडेंच्या टेबलवरील सीजर पासून ते कार्यालयातील पडदे या फोटोत दिसत असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. कायद्यानुसार कोणताही पंचनामा घटनास्थळी करणे बंधनकारक आहे. मात्र, इथे घटनास्थळाऐवजी एनसीबीने त्यांच्या कार्यालयात पंचनामा केल्याचं दिसून आलं. ही वानखेडेंची घोडचूक असल्याचं सांगण्यात येतं.

Published on: Nov 06, 2021 08:39 AM