MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 November 2021
गेल्या पाच सहा महिन्यांपासून मी सुनील पाटील यांच्यासोबत आहे. ते माझं एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसे दिले होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होतो. त्यासाठी सतत त्यांच्यासोबत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेललाही थांबलो आणि अनेक हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत राहिलो. पण फॉर्च्युन हॉटेलमध्ये 27 सप्टेंबर रोजी वाशीमध्ये फॉर्च्युनमध्ये दोन रुम बूक होते. साधारण साडे सातच्या सुमारास भानुशाली आणि एक जाडी मुलगी त्या ठिकाणी आली होती.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आलं आहे. या प्रकरणात मोठी डील झाली होती. मात्र, नंतर ही डील फसली होती, असा दावा या प्रकरणातील एक साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे.
टीव्ही 9 मराठीने थेट शिरपूरमध्ये जाऊन या प्रकरणातील साक्षीदार विजय पगारे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी क्रुझ ड्रग्जप्रकरणाच्या दोन दिवस आधी काय काय घडलं होतं, याचा आँखो देखा हालच पगारे यांनी सांगितला. शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आलं आहे. सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि केपी गोसावी आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केला आहे.
गेल्या पाच सहा महिन्यांपासून मी सुनील पाटील यांच्यासोबत आहे. ते माझं एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसे दिले होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होतो. त्यासाठी सतत त्यांच्यासोबत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेललाही थांबलो आणि अनेक हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत राहिलो. पण फॉर्च्युन हॉटेलमध्ये 27 सप्टेंबर रोजी वाशीमध्ये फॉर्च्युनमध्ये दोन रुम बूक होते. साधारण साडे सातच्या सुमारास भानुशाली आणि एक जाडी मुलगी त्या ठिकाणी आली होती. दुसऱ्या रुममध्ये मी, किरण गोसावी आणि सुनील पाटील असे तिघे जण होतो. भानुशाली त्याच्या रुममध्ये दोन तास थांबला. नंतर निघताना भानुशाली आमच्या रुममध्ये आला. यावेळी त्याने सुनील भाऊंची पप्पी घेतली. भाऊ बडा गेम हो गया. आपने को अभी के अभी अहमदाबाद निकलना है. नाना को नही लेना है. (मला नाना म्हणतात) मी म्हणालो, तुमचं काय असेल ते असेल. पण माझे पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. त्यावर तुम्ही चिंता करू नका तुम्हाला तुमचे पैसे मिळेल, असं भाऊ म्हणाले. आम्ही येईपर्यंत रुम सोडू नको म्हणून त्यांनी मला बजावलं होतं, असं पगारे म्हणाले.