MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 November 2021

| Updated on: Nov 08, 2021 | 8:41 AM

मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेले सर्व आरोप सुनील पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ऋषिकेश देशमुखांना मी ओळखत नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कधीच भेटलो नाही, असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.

सुनील पाटील आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मोहित कंबोज यांनी केलेले. आर्यन खान प्रकरणात मला फसवलं गेलं. मी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. हवं तर सीसीटीव्ही फुटेज काढून तपासा, असं आव्हानच सुनील पाटील यांनी दिलं.

मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही. ऋषी देशमुख यांना मी ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असं ते म्हणाले.

Published on: Nov 08, 2021 08:41 AM