MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021

| Updated on: Oct 09, 2021 | 7:51 AM

सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. तर राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय

सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

Published on: Oct 09, 2021 07:50 AM