MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 September 2021
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Anil Daga) यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही काल रात्री अटक करण्यात आली होती. सीबीआयने दिल्ली आणि अलाहाबाद येथील त्यांच्या ठिकाण्यांवरही छापे टाकले होते. दरम्यान, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. चतुर्वेदी बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात गाडी थांबवून सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. त्याच वेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याचं वृत्त आलं होतं. एकूण 10 जणांच्या टीमने ही कारवाई केली होती. मात्र जावई गौरव चतुर्वेदी यांचं अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला होता. अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.