MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 June 2021

| Updated on: Jun 29, 2021 | 1:39 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअप म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप हे लीलावती रुग्णालयात होतं. मात्र उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावर असल्याने जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी H N रिलायन्स रुग्णालय निवडलं.