MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 September 2021

| Updated on: Sep 09, 2021 | 1:42 PM

नागपूर मेट्रोत पदभरती करताना आरक्षण डावलले, आणि बहुजन समाजावर अन्याय केला, असा आरोप करत आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर मेट्रो भवनला घेराव घालण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

नागपूर मेट्रोत पदभरती करताना आरक्षण डावलले, आणि बहुजन समाजावर अन्याय केला, असा आरोप करत आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं नागपूर मेट्रो भवनला घेराव घालण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. काँग्रेस कार्यकर्ते मेट्रो भवनच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असल्याने, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं…. यावेळी “आरक्षण डावलून पदभरती, नोकरभरतीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करत, मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षीत यांनी खुल्या वर्गाच्या जास्त जागा भरल्या’ असा आरोप शिवानी वडेट्टीवार यांनी केलाय. बिंदू नामावली जाहीर केली नाही, तर पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी दिलाय.