MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 22 December 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 22 December 2021

| Updated on: Dec 22, 2021 | 3:51 PM

सर्व गदारोळात भास्कर जाधव यांनी उभे राहून सभागृहाची जाहीर माफी मागितली. पंतप्रधानांची नक्कल करताना मी बोललेले शब्द मागे घेतो तसेच मी केलेला अंगविक्षेपही मागे घेतो, असे वक्तव्य करत त्यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागत असल्याचे म्हटले. त्यानंतर विभानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले.

विधानसभा अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी एका विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसेच बोलताना पंतप्रधानांसारखा अंगविक्षेपही केला. यावरून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी एक तर जाहीर माफी मागावी नाही तर त्यांचं तत्काळ निलंबन करावं, या मागणीवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अन्यथा सभागृह स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतले तरीही भाजपचा संताप आणि कोलाहल सुरुच होता.

या सर्व गदारोळात भास्कर जाधव यांनी उभे राहून सभागृहाची जाहीर माफी मागितली. पंतप्रधानांची नक्कल करताना मी बोललेले शब्द मागे घेतो तसेच मी केलेला अंगविक्षेपही मागे घेतो, असे वक्तव्य करत त्यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागत असल्याचे म्हटले. त्यानंतर विभानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले.